
– सालेभट्टी येथील नववधू भगिनीस २१ हजारांचा अहेर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या वाढदिवशी दिलेले शब्दरूपी वचन पाळले असून ता.आठ मे रोजी सालेभट्टी येथील नववधू भगिनीस थोरला भाऊ या नात्याने २१ हजार रुपयांचा अहेर दिला.
११ मार्च रोजी तालुक्यातील सालेभट्टी येथील नागरिकांनी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराना यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला होता.
दरम्यान पुढील एक वर्षात सालेभट्टी येथील ज्या नववधू भगिनींचे लग्नकार्य होईल त्या भगिनीस जनहित कल्याण संघटने कडुन २१००० रुपयांचा अहेर दिला जाईल असा शब्द त्यांनी यावेळी दिला होता.
आपल्या शब्दरूपी वचनावर ठाम राहत कु.साक्षी अभिमान आत्राम या नववधूचे नऊ मे रोजी लग्न कार्य असल्याने गौरीशंकर खुराना यांनी ता.८ मे रोजी हळदीचे दिवशी आत्राम कुटुंबास भेट देत थोरल्या भावाचे कर्तव्य पार पाडत लहान बहिणीस २१ हजार रुपयांचा अहेर दिला.
यावेळी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे सह रवी पोटे ,सचिव निलेश तेलंग, समीर कुडमेथे ,अंकुश माफुर,रॉयल सय्यद , सौ.छाया माफुर, नववधू साक्षी,आई-वडील तसेच सालेभट्टी येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.