
– मारेगाव शहरातील घटना
– अवघ्या काही क्षणात संशयित पोलिसांच्या ताब्यात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथे लग्न समारंभासाठी आलेल्या एका बावीस वर्षीय युवतीचा विनयभंग झाल्याची घटना सात मे रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान घडली. सदर घटनेची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असता अवघ्या काही क्षणात पोलिसांनी संशयित आरोपीस जेरबंद केले.
शहरात रोमीयोंचा उच्छाद वाढला असून मैत्रिणीच्या लग्न समारंभासाठी आलेली एक महाविद्यालयीन युवती लग्नसोहळा आटपून मामाच्या घरी रस्त्याने एकटी जात असता येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहा मागे मनोज पुंडलिक माहुरे (२७) रा.वेगाव याने मागाहून दुचाकीने येत युवतीला भरवस्तीत थांबवून अश्लील शिवीगाळ करत छेडछाड केल्याची धक्कादायक घटना सात मे रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान घडली.
या अनपेक्षित प्रकाराने घाबरलेल्या युवतीने आपल्या मामाचे घर गाठत आपबिती कथन केली केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मामाने युवतीसह पोलीस स्टेशन गाठत सदर युवका विरोधात तक्रार दाखल केली.
युवतीने दिलेल्या तक्रारी वरून मारेगाव पोलिसांनी अवघ्या काही क्षणात संशयितास जेरबंद केले असुन भादवी ३५४,२९४,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा तपास पो.ऊ.नी.ज्ञानेश्वर सावंत यांचे मार्गदर्शनात पो.हे.का.आनंद अलचेवार ,ना.पो.का.राजु टेकाम करीत आहे.