
— मारेगाव तालूक्यातील गुरुदेव सेवकांसह अनेकांचा सहभाग
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आषाढी एकादशीचे औचित्य साधुन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन पांडुरंगाचे दर्शनासाठी असंख्य वारकरी येत असल्याने पंढरपुर येथील चंद्रभागा पात्रात व परिसरात घाण होवुन कोणताही आजार वारकऱ्यांना होवू नये यासाठी सलग १० वर्षापासुन मारेगाव तालूक्यातील शंभरावर व इतरही गुरुदेव सेवक चंद्रभागा पात्राची स्वच्छता करण्यासाठी जात असुन यंदा सुध्दा गुरुदेव सेवकांनी पंढरपुरात जावुन स्वच्छता अभियान ग्रामगीता तत्वज्ञान सक्रीय दर्शन मंदिर पंढरपूर चे संचालक सेवकरामदादा यांचे मार्गदर्शनात ता. १९,२०, व २१ जुलै रोजी राबविण्यात आले.
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपुरात आषाढी एकादशीच्या सुवर्ण पर्वावर महाराष्ट्रामधुन व देशाच्या कानाकोपऱ्यातुन असंख्य वारकरी, भाविक, दर्शनासाठी येतात. त्यामुळे चंद्रभागेचे पात्रात व परिसरात घाण होत असल्याने प्रदुषण होवून आजार होण्याची दाट शक्यता लक्षात घेवुन , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, मागील १० वर्षापासुन गुरुदेव सेवा मंडळाचे राज्य प्रचारक तथा संचालक, ग्रामगीता तंत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर सेवकराम दादा यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनात मारेगाव तालूक्यातील शंभरावर गुरुदेव सेवक सेविका पंढरपुरात जावून चंद्रभागा पात्र, व आजुबाजुचा परिसर स्वच्छ करण्याचे कार्य करत असतात. यावर्षी सुध्दा मारेगाव तालुक्यातील गुरुदेव सेवक सेविकांनी ता. १९,२०, व २१ जुलै ला पंढरपुरात चंद्रभागा नदिच्या पात्रात स्वच्छता मोहीम राबवून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला. यामधे कानडा व हिवरा येथील ११५ सेवक होते. कानडा येथील संरपचा सौ. सूषमा रूपेश ढोके, रुपेश ढोके, सूरज येवले, हरिश्चंद्र डाहूले, भूषन ढोबळे, दिवाकर गाडगे, रामदास ढेंगळे, छाया गाडगे, नामदेव येडे,मूरली येवले, तुकाराम कडूकर यांचेसह गुरुदेव सेवक सेविका यांचा सहभाग होता.