
— हिवरा व कानडा येथील तब्बल ११० गुरुदेव सेवकांचे पंढरपूरला प्रयाण
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव……
आषाढी एकादशीचे औचित्य साधुन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन पांडुरंगाचे दर्शनासाठी असंख्य वारकरी येत असल्याने पंढरपुर येथील चंद्रभागा पात्रात व परिसरात घाण होवुन कोणताही आजार वारकऱ्यांना होवू नये यासाठी सलग १० वर्षापासुन मारेगाव तालूक्यातील गुरुदेव सेवकांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात येत असुन यावर्षी सुध्दा हिवरा व कानडा येथील तब्बल ११० गुरुदेव सेवकांनी, ता.१९,२०,व २१ जुलैला राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानासाठी ग्रामगीता पालखी घेऊन पंढरपुरसाठी, गुरुदेव सेविका तथा सरपंचा ग्राम पंचायत कानडा सौ. सुषमा ढोके यांच्या नेतृत्वात प्रयाण केले आहे.
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपुरात आषाढी एकादशीच्या सुवर्ण पर्वावर महाराष्ट्रामधुन व देशाच्या कानाकोपऱ्यातुन असंख्य वारकरी,भाविक ,दर्शनासाठी येतात. त्यामुळे चंद्रभागेचे पात्रात व परिसरात घाण होत असल्याने प्रदुषण होवून आजार होण्याची दाट शक्यता लक्षात घेवुन ,तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गुरुदेव सेवा मंडळाचे राज्य प्रचारक सेवकराम दादा यांच्या संकल्पनेतुन चंद्रभागा नदी पात्रात मागील अनेक वर्षांपासून स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या स्वच्छता अभियानात आपला सहभाग असावा, यासाठी
मारेगाव तालूक्यातील हिवरा व कानडा येथील गुरुदेव सेवक स्वयंप्रेरणेने मागील १० वर्षांपासून पंढरपुरात जावून चंद्रभागा पात्र, व आजुबाजुचा परिसर स्वच्छ करण्याचे कार्य करत असतात. यावर्षी सुध्दा मारेगाव तालुक्यातील हिवरा व कानडा येथील तब्बल ११० गुरुदेव सेवकांनी, ता. १९,२०,व २१ जुलै रोजी राबविण्यात येणार असलेल्या स्वच्छता अभियान या राष्ट्रीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेण्यासाठी ता. १७ जुलै रोजी कानडा ग्राम पंचायत सरपंचा तथा गुरुदेव सेविका सौ.सुषमा ढोके यांच्या नेतृत्वात पंढरपुर साठी
रुपेश ढोके, सूरज येवले, पंढरी येवले, हरिश्चंद्र डाहूले, दिवाकर गाडगे, रामदास ढेंगळे यांचेसह कानडा व हिवरा येथील गुरुदेव कार्यकर्त्यांनी प्रयाण केले आहे.
आरोग्य निकोप व स्वच्छ राखण्यासाठी शरीराला आंघोळ फार महत्वाची आहे. परंतु आपले घर, परिसर, व गाव जर स्वच्छ असेल तर रोगराई पसरणार नाही, ही एकट्या गाव व स्वतःपूरती मर्यादित बाब आहे. मात्र पंढरपुरात आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर महाराष्ट्रामधुन व देशातुन माऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे परिसर घाण मुक्त करणे ही नितांत गरज असल्याने खारीचा वाटा म्हणुन आम्ही या स्वच्छता अभियानात मागील १० वर्षांपासून सक्रीय सहभाग घेऊन या कार्यक्रमास हातभार लावतो. पांडुरंगाची कृपा असली तर हा उचलेला वसा असाच पुढेही कायम असणार आहे.
सौ.सुषमा रुपेश ढोके,
सरपंचा, ग्राम पंचायत, कानडा
तथा
गुरुदेव सेविका.