
— सदगुरु जगन्नाथ महाराज जेष्ठ नागरिक मंडळाचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क / मारेगांव
गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधून श्री सद्गुरु जगन्नाथ महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने ,जेष्ठ नागरिक भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
दिवसेंदिवस भौतिक वातावरणाचा पगडा असल्यामुळे, नविन मार्ग तयार करत असतांना मोठमोठे वृक्ष कापल्या जात आहे. तर दुसरीकडे जंगले सुध्दा नियोजना अभावी कमी होत आहे. नेहमीच शासन प्रशासन स्तरावरून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येत असले तरी वृक्ष संवर्धनासाठी लागणारे नियोजन सपशेल अपयशी ठरत आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने अवकाळी पाऊस, आजार मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. म्हणून निसर्गाचा समतोल राखणे आवश्यक असल्याने, खारीचा वाटा उचलत किन्हेकर ले आऊट मधील जेष्ठ नागरिक भवनाच्या परिसरात गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री सदगुरु जगन्नाथ महाराज जेष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले .याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष मारोती ठावरी, सचिव वसंत कौरवार, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सपाट, बाळकृष्ण ढोके, एम आर वरारकर, भास्कर धानफुलें, विठ्ठल झाडे, शेख इस्माईल शेख आदी मंडळी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.