
– नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील सिंदी (महागाव) येथे ता.९ जुन रोजी ‘शासन आपल्या दारी’ शिबिराचे आयोजन येथील जि.प.शाळेत करण्यात आले होते.यास येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध दाखले घेण्याकरिता व आरोग्य तपासणी करिता येथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
‘शासन आपल्या दारी’ हा महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम असुन या उपक्रमाचे वैशिष्टय म्हणजे शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी हे अभियान कार्यरत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनाशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतात.
दरम्यान ता.९ जुन रोजी तालुक्यातील सिंदी (महागाव) येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात येथील नागरिकांनी विविध दाखले मिळविण्याकरिता व आरोग्य तपासणी करिता सिंदी (महागाव) येथील प्राथमिक शाळेत एकच गर्दी केली होती.यावेळी नागरिकांना विविध दाखले देत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी मंडळ अधिकारी मडावी,विस्तार अधिकारी जाधव,वि.अ.मुनेश्वर,सरपंचा नीलिमा थेरे,मंडळ अधिकारी कांडारकर, उपसरपंच व कृ.उ.बा.स.संचालक अविनाश लांबट,तलाठी चिकनकर, प्रदीप डाहुले, दिनेश गेडाम, चंद्रशेखर ढवस,संगीता वाघाळे,विमल आत्राम, पोलीस पाटील संतोष निब्रड, सुरेश बोंडे यांचेसह सिंदी (महागाव) तसेच रामेश्वर येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.