
– तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येथील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थि कु.जिया नगराळे व अत्रेय कुत्तरमारे यांची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.चिमुकल्यांच्या सुवर्ण भरारीने तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असुन दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नुकताच २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.यात मारेगावातील स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूलने आपला उत्कृष्ट निकालाचा वसा कायम ठेवला आहे.
येथील कु.जिया नगराळे (९४%) व अत्रेय कुत्तरमारे या दोन चिमुकल्यांची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कु.जिया व अत्रेय यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल,प्राचार्य यांचेसह शाळेतील शिक्षकांना दिले आहे.