
– राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मारेगावचा झेंडा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पुसद येथे १४ मे रोजी पार पडलेल्या नवव्या महाराष्ट्र स्टेट कराटे स्पर्धेत चिमुकल्यांनी सुवर्ण झेप घेत सदर कराटे स्पर्धेत मारेगावचा झेंडा उंचावत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे १४ मे रोजी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील असंख्य चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला होता.
यात मारेगावचे चिमुकलेही त्यांचे प्रशिक्षक संतोष राठोड यांचेसह मैदानात उतरले होते. या कराटे स्पर्धेत चिमुकल्यांनी दैदिप्यमान अशी कामगिरी करत मारेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत कार्तिक सुनील माफुर यास गोल्ड मेडल, अविष्का मनोज बीडकर सिल्वर मेडल,शुभ विजय टेकाम सिल्वर मेडल,रूद्र कैलास दुधकोहले ब्रांज़ मेडल ,भूमि सतीश मस्की ब्रांज़ मेडल मिळवीत चिमुकल्यांनी दैदिप्यमान अशी कामगिरी केली.
चिमुकल्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून चिमुकल्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई,वडील तसेच प्रशिक्षक संतोष राठोड यांना दिले आहे.