
– नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पावसाळ्यास सुरुवात होणार असल्याने पशुधनाची विशेष काळजी घेण्याची नितांत गरज आहे.त्या अनुषंगाने तालुक्यातील घोगुलदरा येथे ९ जुन रोजी घटसर्प रोग प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.यास येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पावसाळ्यात गायी, म्हैस, शेळ्या-मेंढ्या या जनावरांना घटसर्प, आंत्रविषारी व फऱ्यासारखे रोग होण्याची भीती असते. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पशुधनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने मान्सूनपूर्व लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान ९ जुन रोजी तालुक्यातील घोगुलदरा येथे ‘घटसर्प प्रतिबंधक लसीकरणाचे’ आयोजन करण्यात आले होते.यात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी एलडीओ डॉ. पूनम नागपूरे यांचेसह ए.आय.टी.सुरज देवगडे तसेच घोगुलदरा येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.