
— माजी सैनिकांचा सन्मान, वारकऱ्यांचा सत्कार
— मा.व.पो.नि.अशोक मेश्राम व मित्र परिवारांचा पुढाकार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, राळेगाव विधान सभा क्षेत्रातील जनतेला “ए वतन तेरे लिये ” या देशभक्तीपर गीतांची संगीतमय मेजवानी देण्यासाठी अमरावती येथील संगम ऑर्केस्ट्राचे, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, राळेगाव येथील भाऊसाहेब कोल्हे सभागृहात आयोजन करण्यात आले असुन याच कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सन्मान, पंढरपूर वारीतील वारकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्काराचे आयोजन माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम व मित्रपरिवाराच्या पुढाकाराने करण्यात आले असुन या कार्यक्रमास हजारोच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन बेंबळा कालवे सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
“ए वतन तेरे लिये” या संगीतमय कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सैनिक अंनत लक्ष्मणराव वाट तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ॲड.प्रफुल्ल मानकर असुन प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद सुधीर
पाटील जवादे, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम आहेत.
विज्ञान व भौतिक जगात प्रत्येक समाजातील घटकांचे जीवनमान उंचावले असुन, शहरासह ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या ८० टक्के घरी टीव्ही असल्याने आज मंचावर होणाऱ्या थेट कार्यक्रमाकडे लोकांनी पाठ फिरवली. त्यामुळे कार्यक्रमातून होणाऱ्या समुपदेशनाला माणुस मुकला असल्याचे वास्तव असतांनाच, जनतेत समाज सेवा, देशसेवा, तथा समाज ॠण फेडण्यासाठी जागृती निर्माण व्हावी यासाठी, राळेगाव विधान सभा क्षेत्रातील भुमीपूत्र माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम व मित्र परिवाराच्या पुढाकारातून “ए वतन तेरे लिये” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्य दिनी भाऊसाहेब कोल्हे सभागृहात सकाळी ११ वाजता करण्यात आले. याच कार्यक्रमात माजी सैनिक, वारकरी व सामाजिक कार्यकरत्यांच्या सत्काराचे सुध्दा आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमास हजारोच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन बेंबळा कालवे सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.