
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे ता.१४ मार्चपासुन बेमुदत काम बंद आंदोलन सुरु असुन सातव्या दिवशी ता.२०मार्च रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संपास महाविकास आघाडीने जाहीर पाठींबा दिल्याचे पत्र दिले.
महाराष्ट्र राज्य सरकारी,निम सरकारी कर्मचारी,शिक्षक-शिक्षकेत्तर,जिल्हा परिषद,मुख्यध्यापक,कंत्राटी कर्मचारी, महानगर पालिका,नगरपरिषद,नगर पंचायती कर्मचारी समन्वयक समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने ता .१४ मार्च पासून जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यासाठी बेमुदत संप पुकारण्यात आला.या संपास महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा असल्याबाबतचे पत्र ता.२० मार्च रोजी दिले.
संपावर असलेल्या राज्य कर्मचाऱ्यां अभावी जनतेची रखडलेली कामे पूर्ण होत नसुन शासनाने जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करावी असे सदर पत्रात नमूद केले आहे.
यावेळी माजी जि.प.सदस्या अरुणाताई खंडाळकर,शिवसेना तालुकाप्रमुख संजय आवारी,रा.का.तालुका अध्यक्ष भारत मत्ते, का.ता.अ.मारोती गौरकर,रवींद्र धानोरकर समवेत महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा बेमुदत संप सुरूच राहणार आहे.”
प्रीतम राजगडकर,
कृती समिती अध्यक्ष