
– सारथी संस्थेचा उपक्रम
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
प्रतिनिधी : किन्ही (जवादे)
सारथी संस्थेद्वारा आयोजित ‘कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमांतर्गत कुणबी,मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील एम.के.सी.एल.च्या निवडक अधिकृत केंद्रांवर मोफत संगणक व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
१८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत तालुकास्तरापर्यंत सारथी संस्थेमार्फत नि:शुल्क व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी लक्षित गटातील पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील एम के सी एल च्या निवडक अधिकृत केंद्रावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे
सदर प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक संपूर्ण माहिती व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विध्यार्थीनी एम के सी एल च्या अधिकृत केंद्रावर भेट द्यावी असे आवाहन श्री.दत्त कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट कुंभा (तालुका मारेगाव)चे संचालक श्रीकांत कावडे,भारती सॉफ्टलिंक मारेगाव चे संचालक तेजु पिंपळशेंडे, भवानी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट (खैरी)चे संचालक गणेश शास्त्रकार, श्री चिंतामणी कॉम्प्युटर इंस्टीट्युट (राळेगाव) चे संचालक आशिष इंगोले यांनी केले आहे.