
– नऊ लाखाच्या मुद्देमालासह पाच जन ताब्यात
– स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील करणवाडी-रोहपट रस्त्यावरुण कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता ३० मे रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान सापळा रचून कत्तली करीता नेत असलेल्या पंचेचाळीस जनावरांची सुटका करण्यात आली.याप्रकरणी पाच व्यक्तींसह नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मारेगाव येथुन दिग्रस मार्गे तेलंगणा येथे अतिशय निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे पायी नेली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.दरम्यान ३० मे रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान तालुक्यातील करणवाडी-वागदरा रस्त्यावर सापळा रचला.
जनावरांच्या कळपासह काही व्यक्ती पायी जात असता सदर व्यक्तींना याबाबत विचारपुस केली असता त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने फास आवळला असता तीन तीन च्या कळपात प्रत्येकी १५ जनावरे कत्तली करीता नेत असल्याची कबुली पाचही व्यक्तींनी दिली.त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेवर प्राण्यांना कृरतेने वागविण्यासंबंधीच्या प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तसलीम खा वहाब खा कुरेशी (४४),मुकुंदा जाधव (३५), सुनील गुंजेकार (२४),संजय भोजेवार (४१) व उमेश चापले (३१) सर्व रा.मारेगाव अशी पाचही आरोपींची नावे असून त्यांचेसह कत्तली करिता नेत असलेले तब्बल ४५ बैल अंदाजे किंमत (नऊ लाख रुपये) मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, प्रदीप परदेशी पो.नि. स्थागुशा, यांचे मार्गदर्शनात पोउपनि योगेश रंधे, अंमलदार, योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, नरेश राऊत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यशस्वीरित्या पार पाडली.घटनेचा तपास मारेगाव पो.स्टे.ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात सहा. फौजदार किसन सुंकुरवार, विनेश राठोड करित आहे.