
– कु.प्रणाली ढवस JEE B arch परीक्षेत देशात ४७ वी
– तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील मुकटा येथील शेतकरी कन्या कु.प्रणाली विजय ढवस हि JEE B arch परीक्षेत ९९.७३ % घेत देशात ४७ वी आली आहे. ग्रामीण भागातील एका शेतकरी कन्येचे हे दैदिप्यमान यश भल्याभल्यांना भुरळ घालणारे असुन प्रणालीने या भरारीने मारेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कु. प्रणालीने आपले महाविद्यालयीन शिक्षण वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात मागील वर्षी पूर्ण केले. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असलेल्या कु. प्रणालीने १२ व्या वर्गात महाविद्यालयातून ८६.६३% गुण तिसरा येण्याचा बहुमान मिळविला होता.
अवघ्या सात एकर शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या विजय ढवस यांचे कन्येने JEE B arch परीक्षेत देशात ४७ वी येत घेतलेली ही फिनिक्स भरारी खरंच कौतुकास्पद आहे. प्रणालीने आपल्या यशाने मारेगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
प्रणालीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील , आजी-आजोबा यांचेसह महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांना दिले आहे.