
– संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे हस्ते फलकाचे अनावरण
– ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने युवकांचा उस्फूर्त सहभाग
सामाजिक बांधिलकी जोपासत कुठलाही राजकीय वारसा नसतांना तालुक्यातील तरुणाई सोबत घेवुन याच शिलेदाराच्या अथक परिश्रमातुन जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या संकल्पनेतुन जनहित कल्याण संघटनेची पायाभरणी करण्यात आली.
आज जनहित कल्याण संघटनेला पुर्ण नऊ महिने होत असतांना, सर्वसामान्यांच्या दुःखात सहभागी होऊन गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यावर जनहित कल्याण संघटनेचा भर असुन या आठच महिन्यात संघटनेची उत्तुंग भरारी उरात धडकी भरवणारी ठरत असुन आता ग्रामीण भागातील युवक स्वयंस्फूर्तीने समोर येत गाव खेड्यात जनहित कल्यान संघटनेच्या शाखा उघडण्यावर भर देत आहे.
नुकताच पिसगाव येथील युवकांनी समोर येत शाखा उघडण्यात आली असुन आतिषबाजी व ढोलताशाच्या गजरात शाखा फलकाचे अनावरण, जनहित कल्यान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे हस्ते, तथा मानद सचिव सचिन देवाळकर, मार्गदर्शक काशिनाथ पाटील खडसे, दिनकर पाटील डुकरे, रवी पोटे,नंदेश्वर आसुटकर, अंकुश माफुर, ता.अध्यक्ष समिर कुडमेथे, ता. उपाध्यक्ष राॅयल सय्यद, गौरव आसेकर व पीसगाव शाखाध्यक्ष भुषण कोल्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जनहित कल्याण संघटनेचे समाजाभिमुख कार्य युवकांना प्रेरित करणारे असुन, त्यातुन प्रेरणा घेत पिसगाव येथील युवकांनी एकत्र येऊन पिसगाव येथे जनहित कल्याण संघटनेची पहीली शाखा स्थापन करुन तालुक्यात आदर्श निर्माण करत मुहुर्तमेढ रोवली आहे. |
जनहित कल्याण शाखा पिसगाव…
अध्यक्ष… भुषण कोल्हे, उपाध्यक्ष मनोज झिंगरे, सचिव राहुल झाडे.
शाखा सदस्य… विकास चौधरी, सुखराज दुधकोहळे, नामदेव नेहारे, नितिन नेहारे, रमेश पाचभाई, गौरव गौरकार, मंगेश अडस्कर, सुहास दुधकोहळे, रमेश बावणे, शंकर मांदाडे, सुरज झोटींग, महेश झिंगरे, विनोद बावणे, सुशांत बावणे, सतीश उलमाले.