
– मारेगाव तालुक्याचा निकाल ८९.८९ टक्के
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आला.यात मारेगाव तालुक्यातून ८६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असुन ७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल ८९.८९ टक्के आहे.सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.
तालुक्यातील निकाल पुढीलप्रमाणे…
•भारत विद्या मंदिर,कुंभा कला शाखा ८९.१८ टक्के.
•राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय,मारेगाव विज्ञान शाखा १०० टक्के.
•कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,मारेगाव कला शाखा ८३.९२ टक्के,वाणिज्य शाखा ९८.०३, विज्ञान शाखा १०० टक्के.
•राष्ट्रीय कला कनिष्ठ महाविद्यालय, हिवरा कला शाखा ७२.५० टक्के.
•आदर्श कला कनिष्ठ महाविद्यालय कला शाखा ७०.८३ टक्के.
•बालाजीपंत चोपणे कनिष्ठ महाविद्यालय,बोटोनी कला शाखा ८८.४६ टक्के.
•जिवन विकास कनिष्ठ महाविद्यालय,हटवंजारी कला शाखा ९३.५४ टक्के.
•विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,कान्हाळगाव कला शाखा ७६.४७ टक्के,
वाणिज्य शाखा १०० टक्के.
•शासकीय आश्रमशाळा,बोटोनी कला शाखा ९६.९६, विज्ञान शाखा १०० टक्के.
•संकेत कनिष्ठ महाविद्यालय कला शाखा ९२.३०, विज्ञान शाखा ९८.८७ टक्के.
•नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय,मैसदोडका कला शाखा ९४.६१ टक्के.
•विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालय,मारेगाव विज्ञान शाखा १०० टक्के.
•भारत विद्या मंदीर एम. सी. व्ही सी. शाखा ८० टक्के.