
— खड्ड्यात मुरुम गिटी टाकून खड्डे बुजविण्यास प्रारंभ
— आश्वासनानंतर अर्धनग्न आंदोलन मागे
— मारेगाव/मोरेश्वर ठाकरे…….
मारेगांव मार्डी मार्गावर खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले तर अपघात होऊन जीव सुध्दा गमवावा लागला.याबाबत अनेकदा निवेदन सुध्दा देण्यात आली. परंतू निवेदनाची दखल घेतली नसल्याने, काँग्रेसने रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात ता. २८ जुलै रोजी, १२ वाजेदरम्यान काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पाटील ठाकरे, जिल्हा सरचिटणीस संजय खाडे, माजी महिला व बालकल्यान सभापती अरुणाताई खंडाळकर यांच्या मार्गदर्शनात, व उपस्थितीत तसेच असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, युवक काँग्रेस ता.अध्यक्ष आकाश बदकी, वसंत जिनिंग संचालक अंकुश माफुर यांनी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात बसुन अर्धनग्न आंदोलन केले. लगेच बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्ड्यात गिट्टी, मुरुमाने डागडुजी करण्यास सुरवात करण्यात आली. व आंदोलन मागे घेण्यात आले.
मारेगाव हे तालूक्याचे ठीकाण असल्याने मार्डी परिसरातील १५ / २० गावातील नागरीक कार्यालयीन कामासाठी तर विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना या मार्गावरुनच जाणे येणे करावे लागते. खड्डे चुकवत असताना या मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले तर अपघात होऊन जीव गमवल्याच्या सुध्दा घटना घडल्या आहेत. मारेगाव मार्डी हा मार्ग सन २०२३ मध्येच मंजूर असल्याची माहीती असुन दोन वर्षांचा कालावधी लोटुनही प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही. अनेक वेळा निवेदन दिल्यानंतर नंतर सुध्दा दखल घेतल्या गेली नाही. परिणामी काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेत ता.२८ जुलै रोजी मारेगाव मार्डी मार्गावरील भालेवाडी लगत असलेल्या खड्ड्यातील पाण्यात बसुन अर्धनग्न आंदोलन करावे लागले. दिड दोन तास मात्र या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुहास ओचावार आंदोलन स्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांना आश्वासित करुन गिट्टी मुरुम टाकुन प्रत्यक्ष डागडुजीला सुरवात करण्यात आल्यानंतर अखेर अर्धनग्न आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी जयसिंग गोहोकर, शंकर वऱ्हाटे, पुरुषोत्तम आवारी, कृ.उ.बा समिती सभापती गौरीशंकर खुराणा, प्रफुल्ल विखनकर, तुळशीराम कुमरे, युनूस शेख, समिर सय्यद, भुषण कोल्हे, वसंत आसुटकर, रवी धानोरकर, छाया माफूर, उषा मालेकर, गंगा माफूर, मंगला आत्राम, गिरीजा सुडित, वंदना माफुर, सुनिता माफूर, सोनाली गदाई, सुषमा गदाई, मिना खडसे यांचेसह काँग्रेस चे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————
वणी उपविभाग समस्यांचे माहेरघर असुन याला सरकारचा नाकर्तेपणाच कारणीभुत आहे. रस्ते ही मुलभूत गरज असतांना वारंवार निवेदन दिल्यानंतर सुध्दा सर्वसामान्याची दखल घेतल्या जात नाही. म्हणून कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस आता थांबणार नाही. तर वेळोवेळी सर्वसामान्यांच्या पाठीसी उभे राहू.
संजय खाडे,
जिल्हा सरचिटणीस.
——————————–
मारेगाव मार्डी मार्ग अत्यंत दयनीय अवस्थेत असून या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले. जीव सुध्दा गेले. या रस्त्यासाठी आम्ही अनेक निवेदने दिली. परंतु सरकारच्या दुटप्पी व दुर्लक्षित धोरणामुळे वणी उपविभागात अनेक समस्या डोके वर काढत आहे. मात्र यापुढे काँग्रेस चुप बसणार नाही.
सौ.अरुणाताई खंडाळकर
माजी महीला व बालकल्यान
सभापती
——————————-
मारेगाव मार्डी रस्ता अनेक दिवसांपासून खड्ड्यात गेला आहे. या खड्ड्यामुळे नागरिकाचा जीव धोक्यात आला आहे. तालुक्यात समस्या खुप आहेत. यापुढे काँग्रेस जनतेच्या हितासाठी ठामपणे उभी असणार आहे. काँग्रेस हा शांत पक्ष म्हणून नावलौकिक आहे. मात्र झोपेच सोंग घेऊन असणाऱ्या सरकारला काँग्रेसच आपल्या कर्तृत्वाने यापुढे उत्तर देईल.
गौरीशंकर खुराणा.
सभापती, कृषी उत्पन्न बाजार
समिती मारेगांव.