
— मारेगाव पो. स्टेशनला पहिल्यांदाच महिला पोलीस वाहन चालक रुजू
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव पोलीस स्टेशनची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच मारेगाव पोलीस स्टेशनला महिला पोलीस वाहन चालक रुजू झाल्या असून आता मारेगाव पोलिस वाहनाचे सारथ्य महिला पोलीस चालक करणार आहे.
अंकिता लक्ष्मण वडे, ह्या महिला पोलीस वाहन चालक असुन त्यांचे अंबिका नगर, यवतमाळ येथे वास्तव्य आहेत. अंकिता यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर असुन हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. घरची परिस्थिती गरिबीची. वडील भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. अशातच अंकिता मुकुंदराव पवार मिल्ट्री कॉलेज धामणगाव मधुन बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अमलोकचंद महाविद्यालय यवतमाळ येथे बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश घेत शिक्षणाला सुरवात केली. याच काळात त्या पोलीस भरतीची तयारी सुध्दा करत होत्या. पोलीस भरती निघाली आणि २०२३ ला अंकिता यांची पोलीस मध्ये निवड झाली. पुणे जिल्ह्यातील खंडाळा येथे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रथमच मारेगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली. पोलीस महिला वाहन चालक म्हणून त्या रुजू झाल्या.
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत अंकीता आता मारेगाव पोलीस स्टेशन च्या वाहनाचे सारथ्य करणार आहे. अंकिता यांची बहीन इंजिनिअरिंग करत असुन भाऊ पोलीस भरतीची तयारी करत आहे. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या यशाबद्दल अंकिता यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.