
– संशयित आरोपी महागाव येथुन ताब्यात
– पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन युवतीला फुस लाऊन पळवून नेत युवतीचे वारंवार शारीरिक शोषण केल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात पुरती खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पीडित युवतीच्या वडिलांनी मारेगाव पो.स्टे.ला तक्रार दाखल केली असता घटनेच्या चार महिन्यानंतर संशयित आरोपीस महागाव (जि.गडचिरोली) येथुन ताब्यात घेण्यात आले असुन पोक्सो सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेच्या वडिलांनी मारेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान त्यांचे घरी कुणी नसताना एका अज्ञात इसमाने त्यांचे अल्पवयीन युवतीच्या अज्ञानाचा फायदा घेत फुस लाऊन पळवून नेले होते.
सदर घटनेचा तपास सुरू असता तब्बल चार महिन्यानंतर मारेगाव पोलिसांना आरोपी व पिडीत युवतीचा ठावठिकाणा मिळाला.परिणामी जमादार भालचंद्र मांडवकर,प्रमोद जीड्डेवार यांनी महागाव ता.अहेरी जि.गडचिरोली येथे मजल मारत पीडित अल्पवयीन युवती सह संशयित आरोपी संदीप लक्ष्मण आस्वले (२७) रा.हिवरी ता.मारेगाव यास कवेत घेतले.
दरम्यान पीडित अल्पवयीन युवतीने मारेगाव पोलीस स्टेशनला दिलेला तक्रारीनुसार संशयित आरोपी हा लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेच्या इच्छेविरुद्ध वारंवार तिचे लैंगिक शोषण करीत होता.परिणामी पिडीता गरोदर राहिल्याचे पीडित युवतीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
अल्पवयीन पिडीतेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध ३६६(अ),३७६,३७६(१)(ए),३७६(२)(जे)(एन)५०६ तसेच भा.द.वी.सहकलम ४,६ बा.लै.अ.प्र.का.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा तपास मारेगाव पो.स्टे.ठाणेदार राजेश पुरी यांचेसह पो.ना.अजय वाभिटकर करीत आहे.