
– सट्टा बाजाराचा खरा गुन्हेगारी चेहरा ‘भयावह’
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
क्रिकेटमध्ये उघडपणे करोडो रुपयांचा सट्टा चालतो हे सर्वज्ञात असले तरी यावर कुणाचा फारसा अंकुश दिसुन येत नाही.आयपीएलच्या प्रत्येक सामन्यादरम्यान ‘सट्टा’ लाऊन दररोज लाखोंची उलाढाल होत असते. विशेष म्हणजे क्रिकेटवर सट्टा लावण्यात युवा पिढीची संख्या जास्त असल्याने अनेक तरुण आयपीएल क्रिकेट सट्यापाई उध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे.
‘क्रिकेट इज जंटलमन्स गेम’ म्हटले जात असले तरी ही व्याख्या बदलून आता ‘क्रिकेट ईज मनी गेम’ अशी झाली आहे. यात क्रिकेट खेळणारा व क्रिकेटवर सट्टा लावणारा दोघेही मालामाल होतात. नुकतेच आयपीएल सुरू झाल्याने शहरासह तालुक्यात आयपीएल सट्यालाही उधान आले असुन यात युवा वर्ग टॉप वर आहे. आयपीएल सामने सुरू होताच दररोज लाखो रुपयांचा सट्टा लावला जात असुन अनेक युवकांचे भविष्य अंधकारमय होण्याच्या मार्गावर आहे.
वरून लखलखाट असलेल्या आयपीएल सट्टा बाजाराचा खरा गुन्हेगारी चेहरा किती भयावह असु शकतो याची जाण युवावर्गास नसल्याने अनेक युवक आयपीएल सट्ट्याच्या आहारी गेल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
सट्टा ,बेटिंग किंवा जुगार खेळू नये , असा पैसा चांगला नाही. ही लक्ष्मी टिकत नाही असेच आपल्याला वर्षानुवर्षे आपले वाडवडील सांगत आलेत.पण आता मात्र सगळेच चित्र बदलले आहे.
गेम्सच्या नावाखाली हल्ली सट्टा खेळणे गंमत वाटू लागली आहे आणि युवावर्ग या सट्ट्याच्या जाळ्यात अलगद अडकू लागला आहे ही चिंतेची बाब आहे.