
– डोल डोंगरगाव व वनोजा येथील महिलांची पो.स्टे.वर धडक
– निवेदनातुन प्रशासनास साकडे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील डोल डोंगरगाव व वनोजा येथे अवैध दारू विक्रीने पुरता उच्छाद माजविला आहे.परिणामी अनेक संसार उघड्यावर येत कौटुंबिक कलहात वाढ होत आहे. ता.२१ जुलै रोजी अवैध दारू विक्री विरोधात येथील नागरिकांनी एल्गार पुकारत मारेगाव पो.स्टे.वर धडक दिली. यावेळी अवैध दारू विक्रीला लगाम लावण्या संबंधीचे निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील डोल डोंगरगाव व वनोजा येथे असलेल्या एका शेतात गेल्या कित्येक दिवसापासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. या अवैध दारू विक्रीला लगाम लावण्या संबंधीचे निवेदन प्रशासनास वेळोवेळी देण्यात आले. परंतु मुजोर दारू विक्रेता चंद्रकांत सुभाष भोसले (३८) रा.डोल डोंगरगाव यास त्याचा तिळमात्रही फरक पडला नाही.
परिणामी २१ जुलै रोजी डोल डोंगरगाव व वनोजा येथील महिला व नागरिकांनी अवैध दारू विक्रीला तात्काळ लगाम लावण्यासंबंधीचे निवेदन मारेगाव पोलीस स्टेशन सह येथील तहसीलदारांना दिले.अवैध दारू विक्री व पुरवठा करणाऱ्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंदी करण्यात यावी ही मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी डोल येथील सरपंचा शितल येरमे, वनोजा येथील उपसरपंच प्रशांतकुमार भंडारी यांचेसह बेबी पवार,जिजाबाई भोसले, रेखा पवार,शुभांगी पवार, सोनू भोसले, सुनंदा शेरकुरे, मंगला भोसले, इंदुताई तोडासे, तानेबाई टेकाम, उषा भोसले, श्रीहरी लेनगुरे, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष राम लेनगुरे, पो.पा.योगेश बोडणे,संतोष पवार, लक्ष्मण भोसले, नरेंद्र गुरनुले, मुरलीधर तोडासे, चिंतामण भोसले, मारोती पवार, व विनोद भोसले आदी उपस्थित होते.