
– धामणी रोड व रुक्मिणी नगरी येथील पथदिवे बंद
– नागरिकांची न.प.वर धडक
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरातील धामणी रोड व रुक्मिणी नगरी येथील पथदिवे गेल्या दोन महिन्यापासून बंद असून रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. पथदिव्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावून पथदिवे त्वरित सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीसह २६ मे रोजी शहरातील प्र.क्र.१०,११,व १२ येथील नागरिकांनी न.प.कार्यालयावर धडक दिली.
बरीच रेलचेल रहात असलेल्या धामणी रस्त्यावर व रुक्मिणी नगरी येथे रात्रीच्या वेळी ‘किर्र’अंधाराचे साम्राज्य पसरत असून पथदीवे बंद असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पथदीवे बंद असल्याने रात्री शतपावली करणाऱ्यांना अनेक अडचणी येत असून येथील नागरिकांत प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
दरम्यान तब्बल दोन महिन्यापासून बंद असलेल्या शहरातील धामणी रोड व रुक्मीनी नगरी येथील पथदिव्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावावा या प्रमुख मागणी सह शहरातील प्रभाग क्रमांक दहा,अकरा व बारा येथील नागरिक २६ मे रोजी नगरपंचायत कार्यालयावर धडक देत निवेदनातुन प्रशासनास साकडे घातले.
यावेळी अतुल देवगडे ,मनोहर कापसे, अभिजित पोहेकर, निखिल कोरडे,सौरभ ठाकरे,तेजस कापसे, प्रफुल्ल लकडे यांचेसह शेकडो नागरिक उपस्थित होते.