
— निमित्त…..वाढदिवसाचे
एका सामान्य कुटुंबात सामान्य मुल म्हणून जन्मलेला विनोदकुमार इतर सामान्य मुलांसारखाच वाढला. त्यांना लहानपणापासून वेगळं काहीतरी करण्याचा छंद होता. चित्रे काढणे, रांगोळी काढणे, मुर्त्या बनवणे, गाणे म्हणणे, सायन्स मॉडेल बनवने, ऍक्टिंग करणे, कुठल्याही कार्यक्रमात फिल्मी स्टाईलने निवेदन करणे असं नेहमीच काहीतरी करत राहायचा. हा त्यांचा छंदही होता आणि गरजही होती.
त्यांनी ग्रामीण जीवन खूप जवळून अनुभवले. जीवनातील संघर्ष पाहिला. सगळ्या जबाबदाऱ्या पत्करून वडीलाला वाचवण्यासाठी
डॉ. विनोदकुमार यांची धडपड हे विसरण्यासारखे नाही.
स्वतः मनकाविकाराने ग्रसित असणारा डॉ. विनोदकुमार याने
वडीलाच्या उपचारात काही कमी पडू दिलं नाही, अखेर नियतीने डाव साधून कलावंत सदाशिव बापूराव आदे यांना हिरावले.
त्यांचे वडील कलावंत सदाशिव यांना अखेरचा निरोप देताना समशान भूमीतील गर्दी! या कुटुंबाबद्दल बहुमान देणारी होती.
डॉ. विनोदकुमार यांनी वडिलांना श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता आयोजित केलेला भव्य दिव्य कार्यक्रम हा विसरण्यासारखा नाही. साधुसंत, अधिकारी वर्ग, राजकीय नेते सामाजिक संघटना व त्यांच्या स्नेहीजनांनी दूरवरून या कार्यक्रमाकरिता घेतलेली धाव या आदे कुटुंबाबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करणारी आहे.
वडीलावर जीवापाड प्रेम करणारा विनोद कुमार यांनी बापाच्या जाणीव पेरणाऱ्या स्वलिखित बाप नावाचा काव्यसंग्रह तसेच अजून माझा बाप काही केल्या मरत नाही हा कथासंग्रह निर्माण केला. वडीलाचे महत्व लेकराविषयी त्यांची धडपड, वडीलाच्या योगदान आपल्या पुस्तकात शब्दबद्ध केले.
या अगोदर डॉ. विनोदकुमार आदे यांच टुकार नावाचं काव्यसंग्रह प्रकाशित आहे.
अतिशय दुर्गम भागातून नवरगाव, मारेगाव येथून अंगात असलेले
कौशल्य घेऊन डॉ. विनोदकुमार वणीत स्थायिक झाले आणि कला क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. हाताला काम मिळू लागले
हळूहळू एका वृत्तवाहिनीची निर्मिती करून वास्तिकतेवर प्रहार करत पत्रकारीतेत ही मजल मारली.
विविध क्षेत्रात कामगीरीबद्दल ठीकठिकाणी सत्कार झाले, मानसन्मान मिळाला. लहानपणापासून खूप हालअपेष्ठा भोगलेला विनोदकुमार यांनी स्वतःला कुठल्या व्यसनांच्या आहारी जाऊ दिले नाही. आज समाजात व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. डिजिटल माध्यमांचा विकास झाला पण ही विविध सामाजिक माध्यमे चांगल्यापेक्षा वाईट कामासाठी अधिक वापरली जात आहेत. समाजातील अन्याय, अत्याचार, शोषण, गरिबी, बेरोजगारी, भुकमरी अशा विविध विषयावरील डॉ. विनोदकुमार यांनी लेखन व कविता, गिते लिहिले आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून देखिल यावर जनजागृती-प्रबोधन केले.
अंगात असलेले शेकडो गुण आजही डॉ. विनोदकुमार यांना स्वस्त बसू देत नाही. त्यांचे जीवन पुढे उंचवण्यासाठी त्यांना बळ देणार आहे. डॉ. विनोदकुमार आदे कलाक्षेत्रात त्यांच्या अंगात असलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप मोठी क्रांती घडवणार हे सर्वश्रुत आहे.
सर्व गुण संपन्न असलेल्या व्यक्तिमत्व
डॉ. विनोदकुमार सदाशिव आदे यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.