
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शिक्षकांच्या समस्या, सामाजिक भान असणारे तथा शिक्षक संघटनेचे दमदार नेते दिवाकर चंपतराव राऊत यांनी ता. २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान मिडास रुग्णालय नागपूर येथे उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
दिवाकर चंपतराव राऊत मारेगाव पंचायत समिती अंतर्गत हे एक उत्कृष्ट शिक्षक म्हणुन कार्यरत असतानाच शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी त्यांनी शिक्षक संघटना स्थापन केली. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.
मागील काही दिवसापासून त्यांची मानसिकता विचलित झाल्याची माहीती असुन त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु नियतीचा खेळ कुणालाच कळला नाही. नियतीच्या मनात वेगळेच होते, उपचारादरम्यान अकस्मातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या मागे दोन मुले आणि पत्नी व आप्तपरिवार आहे. त्यांची अशी एक्झिट मनाला चटका लावणारी ठरत आहे.
स्वर्गीय दिवाकर चंपतराव राऊत यांचा अंत्यसंस्कार त्यांचे मुळगाव एकदरा ता.वरूड जि.अमरावती येथे ता. ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.