
— लाडक्या बहिणचे बेमुदत साखळी उपोषण सुरु
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगांव…..
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या सी एल -३ अनुज्ञप्ती क्र. ५२ या देशी दारूच्या व्यवसायाविरोधात २०२३ पासून प्रभागातील महिलांनी वारंवार तक्रारी केल्या. परंतु आजपर्यंत त्या तक्रारीची संबंधीत विभागाकडून दखल घेण्यात आली नसल्याने, प्रभाग क्रमांक १२ मारेगाव येथील लाडक्या बहीणींनी बेमुदत साखळी उपोषणाचे हत्यार उपसले असून ता.२४ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
मार्डी रोड मारेगाव येथील स्थलांतरीत झालेले देशी दारूचे दुकान बुद्धविहारा जवळ सुरु केल्याने येथील लाडक्या बहीनींनी बेकायदेशीर सुरु करण्यात आलेले देशी दुकान हटविण्यासाठी संबंधित प्रशासनाला रितसर निवेदन दिले. परंतु आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने प्रशासनाने थातूरमातूर चौकशी करण्यात आल्याचा ठपका सुध्दा उपोषणार्थी लाडक्या बहीणींनी ठेवत सोमवार ता. २४ फेब्रुवारीपासून पासून प्रभाग क्र. १२ मधील लाडक्या बहिणींनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी या साखळी उपोषणात नूतन तेलंग, मोनाली रायपुरे, पूजा तेलंग, अश्विनी खाडे, तुळसा तेलंग, सुकेशीनी पाटील, शीतल तेलंग, वैशाली तेलंग, सोनू पाटील, कविता ताकसांडे, लता वनकर, सारिका पाटील, स्मिता खैरे, पूनम पूनवटकर, प्रतिभा चौधरी, इंदिरा ताकसांडे, वर्षा तामगाडगे, केशर रायपुरे, सुलताना कुरेशी, जमीला शेख, रूपाली पाटील, प्रियंका रायपुरे आदी महिला सहभागी होत्या.