
– अ.भा.स.प.चे जि.प.मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात मोठा अडथळा ठरत असून जि.प. शाळांना शिक्षक उपलब्ध करून द्या,अशा आशयाचे निवेदन अ. भा.स.प.तालुका मारेगाव यांनी ७ जून रोजी गटशिक्षणाधिकारी प.स.मारेगाव नरेंद्र कांडुरवार यांचे मार्फत जि.प. मुख्याधिकारी, यवतमाळ यांना दिले.सात दिवसाचे आत निवेदनाची दखल घेतली न गेल्यास धरणे आंदोलन करू असा इशाराही निवेदनातुन देण्यात आला आहे.
तालुक्यातील अनेक जि.प.शाळा शिक्षका अभावी बंद पडण्याच्या मार्गावर असून कित्येक शाळांत एक अथवा दोन शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांची ही कमतरता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनास आड येत असून शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.
दरम्यान शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या शाळांत त्वरित शिक्षक भरती करण्यात यावी अथवा गावातीलच काही सुशिक्षित युवकांना रोजंदारीवर घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषदेने गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती,मारेगाव नरेंद्र कांडुरवार यांचे मार्फत जि.प.मुख्याधिकारी, यवतमाळ यांना ७ जून रोजी दिले.
सात दिवसाचे आत प्रश्न निकाली न लावल्यास धरणे आंदोलन करू असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
लोकशस्त्र एक्सक्लुझिव्ह…शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनास आड
संबंधित बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://lokshashtr.in/lack-of-lokshastra-exclusive-teachers-hinders-students-learning/
यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचेसह सचिव सुरेश लांडे, सरपंच शुभम भोयर, प्रवीण नाले ,रामचंद्र जवादे, आशिष खंडाळकर ,प्रशांत मोरे, तुळशीराम कुमरे,जगदीश ठेंगणे, अमोल तुरारे, गणेश डाहुले, मारुती तुराणकर उपस्थित होते.