
– मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचा पुढाकार
– रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
डोळे येण्याची साथ सुरू असल्याने शहरातील रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांची रीघ लागत असुन गरजुंना वेळेवर उपचार उपलब्ध होण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.त्या अनुषंगाने पुढाकार घेत तालुका काँग्रेस कमिटीने ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान स्थानिक न.प.प्रांगणात ‘डोळ्यांच्या साथ रोग’ शिबिराचे आयोजन केले आहे.गरजुंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
गत काही दिवसांपासून शहरासह परिसरात डोळे येण्याची साथ सुरू आहे.परिणामी लहान थोरांसह सर्वांनाच या साथीने आपल्या कवेत घेतले आहे.यात अनेक गरजुंना वेळेवर उपचार उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.
ही निकड लक्षात घेता मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान स्थानिक नगरपंचायत प्रांगणात ‘डोळ्यांच्या साथ रोग शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.