
– सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
‘सासरच्या जाचाला कंटाळूनच माझ्या मुलीने आत्महत्या केली’ असा आरोप मृतक महिलेच्या आईने मारेगाव पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीतुन केल्याने रीनाच्या सासरकडील मंडळींवर रीनास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या आत्महत्या प्रकरणास काही वेगळे वेळ मिळते काय…? याकडे आता डोळा लागला आहे.
तालुक्यातील गोंडबुरांडा येथे वर्षभरापूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या रिना सुनील मुसळे (२१) या नवविवाहितेने २० मे रोजी राहते घरी गळफास घेत आत्महत्या केली होती.
मृतक महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार सासरच्या जाचाला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्ये सारखे कठोर पाऊल उचलल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली असुन रीनाचे पती,सासु व सासरे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रीना आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे कडवे आव्हान आता मारेगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.