
♦साई मित्र परिवार,बजरंग दल व शहर वासीयांचा पुढाकार
♦शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
♦लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्राचे आराध्य दैवत,जाणते राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीचे औचित्य साधत साई मित्र परिवार,बजरंग दल व तथा मारेगाव वासीयांच्या विद्यमाने शहरात १० मार्च रोजी सायंकाळी “ढोल,ताशाच्या गजरात” अन् “फटाक्यांच्या आतिषबाजीत” भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील न.प.च्या प्रांगणात शेकडो शिवभक्त व नागरिकांच्या उपस्थितीत सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर “ढोल, ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत” न.प.प्रांगणातुन भव्य रॅली काढण्यात आली.रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले ते वणी येथील “छत्रपती ढोल,ताशा पथक.”आकर्षक रोषणाई सह काढण्यात आलेल्या रॅलीने संपुर्ण शहराला “विळखा” घातल्याचे चित्र दिसून आले.
मिरवणुकीच्या यशस्वीते करीता साई मित्र परिवार मारेगाव,बजरंग दल मारेगाव आणि समस्त मारेगाव वासीयांसह असंख्य शिवभक्तांचे सहकार्य लाभले.