
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मोरेश्वर ठाकरे
मारेगाव पोलीस स्टेशनला कार्यरत सहाय्यक फौजदार प्रमोद केदारराव जिड्डेवार यांना त्यांच्या सेवा काळातील केलेल्या सेवेची व कार्याची दखल घेत पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह ता. १ मे २०२३ रोजी प्रदान करण्यात येणार असुन ता. २७ एप्रिल रोजी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी तथा कर्मचाऱ्यांकडून जिड्डेवार यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सहाय्यक फौजदार प्रमोद जिड्डेवार सन १९८८ ला पोलीस दलात भरती झाले. १९८८ ला त्यांची प्रथम नियुक्ती गडचिरोली जिल्ह्य़ात झाली. सन १९९२ ला त्यांची बदली यवतमाळ जिल्ह्य़ात झाली.
सन १९८८ ते २०२३ या ३५ वर्षात जिड्डेवार यांना आजपर्यंत १८१ रिवार्ड मिळाले असुन आतापर्यंतच्या सेवा काळातील त्यांच्या कार्याची दखल घेत जिड्डेवार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन त्यांना ता. १ मे रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.
ता.२७ एप्रिल रोजी सकाळी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी व कर्मचाऱ्यांकडून सहाय्यक फौजदार प्रमोद जिड्डेवार यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळणार असल्याने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ठाणेदार राजेश पुरी यांचे सह पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत, सहा फौ. ताजने, आनंद अलचेवार, पो.ना. अजय वाभिटकर, रजनिकांत पाटील, जुनैद, राजेंद्र चांदेकर, राजु टेकाम, एल. एस. सी. संगीता दोरेवार, एल पी सी पायल दुधकोहळे, प्रिया निंब्रड, पी सी विनेश राठोड, एन पी एल बारेकर उपस्थित होते. |