
♦अन्यथा शेतकऱ्यास आत्महत्ये शिवाय पर्याय उरणार नाही…
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवून कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात यावा या प्रमुख मागणी संबंधीचे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचे नेतृत्वात २१ मार्च रोजी तहसीलदार,तहसील कार्यालय मारेगाव यांना देण्यात आले.’कपाशीला योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांसमोर आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही’ असे सूचक वक्तव्य सदर निवेदनात करण्यात आले आहे.
मार्च महिन्याचा शेवटचा टप्पा असताना शेतकऱ्यांना बँकेकडून घेतलेले कर्ज व इतर काही व्यवहार पूर्णत्वास न्यावे लागतात.परंतु कापसाला योग्य भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरीच कोंबून ठेवला असून तालुक्यातील शेतकरी “आर्थिक तंगीचा” सामना करत आहे.शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक कुचंबना थांबवून कापसाला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर करावा तसेच कापुस खरेदी त्वरित सुरू करावी ही प्रमुख मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेत मार्फत २१ मार्च रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून कापसाला योग्य भाव न मिळाल्यास ‘शेतकऱ्यासमोर आत्महत्ये शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही’ असे सुचक वक्तव्य सदर निवेदनात करण्यात आले आहे.
यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट,तालुका सचिव सुरेश लांडे,तालुका उपाध्यक्ष मालाताई गौरकार यांचेसह उपसरपंच वनोजा प्रशांत भंडारी,सरपंच संदीप कारेकर,सरपंच रामचंद्र जवादे, सरपंच विना सातपुते,नारायण सातपुते, सरपंच तुळशीराम कुमरे, गजानन आदेवार,उपसरपंच प्रफुल्ल विखनकर, सरपंच दयानंद कुडमेथे याचे सह अ.भा.सरपंच परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.