
– कु.प्रांजली प्रथम, कु.वैष्णवी द्वितीय तर भाग्यवान तृतीय
– महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा निकाल ८८.८८ टक्के
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
नुकताच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. यात मारेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रथम श्रेणी मिळविली.विद्यालयाचा निकाल हा ८८.८८% लागला असून येथील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, मारेगाव येथुन एकूण ९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.पैकी ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत झळकले.
विद्यालयातून कु. प्रांजली विठ्ठल रामपुरे ही विद्यार्थिनी ६७% गुण घेऊन प्रथम,कु.वैष्णवी सुधाकर आत्राम ही ६३% गुण घेऊन द्वितीय तर भाग्यवान नागपुरे हा विद्यार्थी ६२% गुण घेऊन विद्यालयातुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, मारेगाव येथील विद्यार्थी ग्रामीण भागातुन असल्याने तसेच त्यांची घरची परिस्थिती बेताची असल्याने कुठलाही शिकवणी वर्ग न लावता विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी गाठल्याने तीनही विद्यार्थी विशेष कौतुकास पात्र आहे.त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच शाळेतील शिक्षक हेमंत ताजने यांचेसह येथील शिक्षकांना दिले आहे.