
– शेतकरी,शेतमजूर तसेच जनतेचे प्रश्न घेऊन शासनाविरुद् एल्गार
– मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
निद्रिस्त शासनास जाग आणण्यासाठी मारेगाव तालुका काँग्रेस एकवटली असुन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारोती गौरकार व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराना यांचे नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर तसेच जनतेचे प्रश्न घेऊन ता. ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता येथील नगरपंचायत प्रांगणात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
३१ जुलै रोजी आयोजित या महामोर्चात मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करणे,वर्धा नदी लगतच्या झालेल्या शेतकरी व शेतमजुरांचे सर्वे करुन विशेष पकेज द्वारा अर्थ सहाय्य देणे,मागील वर्षीचा राहीलेला शेतकऱ्यांचा पिक विमा व चालू वर्षी चा पिक विमा सर सकट देण्यात यावा, तालुक्यातील चाळणी झालेले रस्ते व लहान पूल उंच करण्यात यावे,नियमित शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक तर्फे सहकारी संस्थेना कर्ज वाटप देण्यात यावे, मारेगाव तालुक्यातील विजेचा लंपनडाव सुरळीत करण्यात यावा,कृषी क्षेत्रातील अवजारे व शेतमालावर तसेच जीवनावश्यक वस्तूवर G.S.T. व C.S.T. कमी करण्यात यावी,सन २०१७ पर्यंतची शेतकऱ्यांची थकीत कर्ज वसुली त्वरित थांबविण्यात यावी,मणिपूर येथील महिला वर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर कार्यवाही करण्यात यावी, भाजपाचे माजी खा.किरीट सोमय्या यांची लैंगीक छळ प्रकरणी विडीओ क्लिप वयारल झाली आहे.या प्रकरणी त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आक्षेपार्य वक्तव्य केल्यामुळे त्यांचेवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी आदी प्रमुख मागण्या करण्यात येणार आहे.
मारेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती गौरकार व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा यांचे नेतृत्वात आयोजित या महामोर्चात तालुका काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार असून यावेळी शेतकरी, शेतमजूर तसेच जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.