
– कांबळे परिवारावर शोककळा
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मारेगाव तालुका सचिव, दै. नमो महाराष्ट्रचे मारेगाव तालुका प्रतिनिधी माणिक कांबळे यांचे वडील किसन कांबळे (८१) काल १२ एप्रिल रोजी बुद्धवासी झाले.
काल दुपारी किसन यांना अकस्मात चक्कर आली असता त्यांना यवतमाळ येथे उपचारा करीता नेले असता प्रकृती खालावल्याने पुढील उपचारार्थ यवतमाळ येथून मेघे सावंगी येथे नेत असता वाटेत पुलगाव नजीक त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,चार सुना,आठ नातवंड असा आप्त परिवार असुन त्यांचा अंत्यविधी आज दुपारी बारा वाजता मार्डी येथे होणार आहे.