
– कोरोना काळात वडील तर हरवले आता आई
– भोयर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील किन्हाळा येथील सरपंच शुभम भोयर यांच्या मातोश्री कल्पना प्रभाकर भोयर यांचे ता.२२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १:३० वाजेदरम्यान वणी येथील सुगम हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या ५० वर्षाच्या होत्या. कोरोना काळात वडील व आता आईचे छत्र हरविल्याने भोयर कुटुंबीयांवर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शुभम भोयर यांच्या वडीलांचे कोरोना काळात निधन झाले होते. अवेळी पतीच्या निधनाने प्रचंड दुखाच्या सावटाखाली आल्याने कल्पना यांची प्रकृती नेहमीच अस्वस्थ राहत होती.
दरम्यान २२सप्टेंबर रोजी कल्पना यांना अस्वस्थ वाटू लागले.लगेच त्यांना वणी येथील सत्यसेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना त्यांच्या स्वगृही परत आणण्यात आले होते.रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले.भोयर कुटुंबीयांनी कल्पना यांना तात्काळ वणी येथील सुगम रुग्णालयात दाखल केले असता मध्यरात्री दीड वाजे दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आधी वडील व आता आईचे छत्र हरविल्याने भोयर कुटुंबीयांवर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक सुवर्णा यांचे पश्चात एक मुलगा,एक मुलगी असुन आज दुपारी १२ वाजता त्यांचे पार्थिवावर किन्हाळा येथील स्मशानभूमीत हिंदू रितीरिवाजा प्रमाणे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.