
– मडावी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
निवृत्त तहसीलदार, काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेवक शंकर मडावी यांच्या पत्नी व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांच्या मातोश्री रत्नमाला मडावी यांचे ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजे दरम्यान दुःखद निधन झाले.मृत्यू समय त्या ६५ वर्षाच्या होत्या.
गत काही दिवसापासून रत्नमाला मडावी यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांचेवर नागपूर येथील रुग्णालयात नियमित उपचार सुरू होते.
दरम्यान ३० ऑक्टोंबर रोजी पहाटे ५ वाजे दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.मृतक रत्नमाला मडावी यांचे पश्चात पती माजी तहसीलदार शंकर मडावी,मुलगा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी,मुलगी सोनूताई, असा आप्तपरिवार असून या दुःखद घटनेने मडावी कुटुंबीयांवर पूरता दुःखाचा डोंगर कोसळला असुन परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आज दुपारी ३ वाजता मारेगाव येथील स्मशानभूमीत मृतक रत्नमाला मडावी यांचा अंत्यविधी पार पडणार आहे.
लोकशस्त्र परिवाराकडून काकुंना भावपूर्ण श्रद्धांजली