
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
जे अशक्य आहे ते साध्य करण्यासाठी नवयुवकांनी सामुदायिक ध्यान संस्कार करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.सुभाष पवार महाराज यांनी अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम शाखा मारेगांव च्या वतीने आयोजित, स्व.चिंधुजी पुरके आदिवासी आश्रम शाळेत, सर्वागीण सुसंस्कार शिबीरात व्यक्त केले.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्व प्रणालीनुसार ग्रामगीता, धर्म, संस्कृती, राष्ट्रीय एकात्मतेस पोषक असा राष्ट्रभक्त तरुण घडावा या दृष्टीने जीवन शिक्षणाचे पाठ आजच्या नवयुवकांना देण्यासाठी श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान या सुसंस्कार शिबीराला हभप सुभाष पवार महाराज यांनी भेट देत सामुदायिक ध्यान केल्यानेच अशक्य साध्य होईल यासाठी संत तुकोबा रायांच्या वाणीतील “”अशक्य ते शक्य करीता सायास कारण अभ्यास”” तुका म्हणे. या अंभागाचे विश्लेषण करून शिबिरातील विद्यार्थिनींना आणी विद्यार्थ्यांना सामुदायिक ध्यान अत्यंत महत्वाचे आहे असे विचार प्रकट करुन मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी शिबीरार्थ्यांसह आयोजक तथा तालूका प्रचारक राजू सिडाम गंगाधर, लोनसावळे महाराज तसेच सेवा मंडळाचे आजीवन सदस्य एम.बी. गुप्ता महाराज यांनी सुद्धा विशेष अतिथी म्हणून संबोधन केले.