
— अन्यथा बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा
— प्रभागातील महिलांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगांव…..
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या सी एल -३ अनुज्ञप्ती क्र. ५२ या देशी दारूच्या व्यवसायाविरोधात २०२३ पासून प्रभागातील महिलांनी वारंवार तक्रारी केल्या. परंतु आजपर्यंत त्या तक्रारीची संबंधीत विभागाकडून दखल घेण्यात आली नसल्याने जिल्हाधिकारी यांना प्रभाग क्रमांक १२ मारेगाव येथील महिलांनी बेकायदेशीर सुरु असलेले देशी दारुचे दुकान तत्काळ बंद करा अन्यथा बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
मारेगांव नगर पंचायत हद्दीतील वार्ड क्र. १ मध्ये प्रभाग क्र. १२ या ठिकाणी पटेल लेआऊट मधील अकृषक रहीवासी उपयोगाकरीता शेत गट क्र. १५/१ अ.प्लॉट क्र. १२ येथे सीएल-३ अनुज्ञप्ती क्र. ५२ परवाना धारक सौ. परिणीता परमानंद जयस्वाल, रा. मार्डी, यांचे वार्ड क्र. २ मधुन वार्ड क्र. १ मध्ये देशी दारू दुकानाचे स्थलांतरणाचे काम सन २०२३ मध्ये सुरु होते व ता. ०२ डिसेंबर २०२४ पासुन सदर ठिकाणी दारु विक्रीच्या व्यवसायास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे या स्थलांतरीत करण्यात आलेल्या देशी दारुच्या दुकानालाला नगर पंचायत प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याची माहीती असुन जर ना हरकत प्रमाणपत्र नाही तर नगर पंचायत हद्दीतील हे दारु दुकान स्थलांतरीत कसे करण्यात आले??? असाही सवाल उपस्थित होत आहे.
सामाजिक स्वास्थ्यास धोका
या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या महीला, लहान मुली मुले, बसस्थानक जवळ असल्याकारणाने शाळकरी
मुले-मुली यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. सदर देशी दारुच्या दुकानात येणारे ग्राहक हे उघड्यावर लघुशंका करतात. दारु पिल्यानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, महीला व शाळकरी आणि महाविद्यालयीन मुली वावरत असतांना त्यांचे समोर अश्लील भाषेत बोलणे, जि. प. व. प्राथमिक शाळेलगत आठवडी बाजार बुध्दविहाराच्या अगदी १००-१२० फुटावर असल्याने मद्यपी लोकांची बुध्दविहाराच्या मुख्य द्वारालगतच्या रस्त्यानेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे तेथे विविध धार्मीक विधी, धम्मदेसना, ज्ञानसाधना, बालशिबीरे इत्यादी धार्मीक कार्य पार पाडत असतांना तळीरामांकडुन अश्लील भाषेत शिवीगाळ, कल्लोळ करीत असल्याकारणाने धार्मीक विधी पार पाडतांना अडथळा निर्माण होत असुन बुध्दविहारातील शांतता भंग होत. आहे.
भविष्यातील धोका व होणारा त्रास
येथे वास्तव्यास असलेल्या महीला पुरुषांनी
भविष्यात होणाऱ्या त्रासाबाबत बौध्दधर्मीय अनुयायांनी त्यांच्या प्रार्थना स्थळ बुध्दविहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मद्यविक्रीस आक्षेप घेवुन स्थानिक अधिकारी नगराध्यक्ष/मुख्याधिकारी, नगर पंचायत कार्यालय मारेगांव यांना तथा पोलीस स्टेशन मारेगांव, तहसिलदार, मारेगांव अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना ता. ११ व १२ जुलै २०२३ रोजी तक्रार अर्जाद्वारे कळविण्यात आले होते. परंतू महिलांच्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही.
अखेर त्या वादग्रस्त जागेची उत्पादन शुल्क विभागाकडून मोजणी
दारु दुकान बंद करण्यात यावे यासाठी निवेदन दिल्यानंतर दखल घेण्यात आली नसल्याने प्रभागातील महीलांनी यवतमाळ गाठत जिल्हाधिकारी तथा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ यांची भेट घेत भविष्यातील परिणामाबद्दल माहीती दिली. व बेकायदेशीर देशी दारु दुकान तत्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला. लगेचच वरिष्ठांच्या आदेशाने अखेर पांढरकवडा येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक हे मारेगाव येथे १२ फेब्रुवारीला येऊन त्यांनी सदर जागेची बुद्धविहार आणि बस स्थानकापासून मोजणी सुद्धा केली. याबाबतचा अहवाल सध्या गुलदस्त्यात असून याकडे मारेगाव वासियांचे लक्ष लागले आहे.
निवेदन देते वेळी नूतन तेलंग, पूजा तेलंग, अश्विनी खाडे, सपना वनकर, सोनिया पाटील,वैशाली तेलंग, शितल तेलंग प्रियंका भास्कर रायपुरे, सोनू पाटील,निलेश तेलंग, सुदर्शन पाटील, विजय खाडे, यांचेसह महिला पुरुष उपस्थित होते.