
– शालेय परिसराची स्वच्छता : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
केंद्र शासनाच्या आदेशाने ‘स्वच्छता पंधरवडा’ हा उपक्रम अवघ्या देशभरात साजरा होतो आहे. १ ऑक्टोंबर रोजी स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात ‘स्वच्छता पंधरवडा’ हा उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ केला.यात विद्यार्थ्यांनी मोठ्या हीरीरीने सहभाग घेतला.
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत साजरा होणारा स्वच्छता पंधरवडा हा ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाच्या स्वच्छता मोहीमेचा एक भाग आहे.परिणामी संपूर्ण देशभरात स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे.
दरम्यान १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात स्वच्छता पंधरवडा हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ केला.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत ताजणे यांचेसह सहाय्यक शिक्षक एम.एम.सोयाम,पी.एम.ठाकरे, सहाय्यक शिक्षीका वनिता दुर्गे,अश्वीता परचाके,शि.कर्मचारी रोहीत काळे,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.