
– युवावर्गास रेसिंग चे वेड
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
शहरातील युवावर्गास फिल्मी स्टाईल बाईक्स चालवण्याचे “वेड” लागल्याने शहरातील रस्ते हे रस्ते नसुन ‘रेसींग बाईक ट्रॅक’ असल्याचा अनुभव शहर वासीयांना रोजच येत असुन आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याने प्रवास करावा लागतो आहे.
मारेगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरात दिवसभर ये-जा करणाऱ्यांची वर्दळ अविरत सुरू असते.कार्यालयीन कामासाठी,बँकेत,शाळा,महाविद्यालय इ. कामानिमित्त बाहेरगावावरून नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शहरात येत असतात.त्यामुळे शहराच्या मध्यातून जाणारा मुख्य महामार्ग हा नेहमीच लोकांच्या गर्दीने गजबजुन असतो.
गर्दीतुन सुसाट बाईक चालवत मार्ग काढणे,जीवघेणी फिल्मी स्टाईल श असे दृश्य सध्या शहरातील रस्त्यांवर दिसत असुन शहरातील रस्ते हे रस्ते नसुन ‘बाईक रेसिंग ट्रॅक ‘आहेत की काय..?असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
शहरात १३ ते १७ या वयोगटातील मुले ही स्टंटबाजी करताना दिसून येत आहे.वाहन चालवण्याचे नियम,अटी माहित नसताना विनापरवाना,बेधुंद वाहन चालवीत आपला तसेच दुसऱ्याचा जीव धोक्यात आणत आहे.शहरात रस्त्यालगतच शाळा तसेच महाविद्यालय असुन रोज शेकडो विद्यार्थी या रस्त्याने ये-जा करतात.सुसाट बाईक्स वरील नियंत्रण सुटून अपघात झाल्यास जबाबदार कोण…? हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात कायम घर करून बसला आहे.