
– पवनी येथे फडकला मारेगावचा ‘झेंडा’
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पवनी जि.भंडारा येथे २ जुलै रोजी पार पडलेल्या प्रहार चषक विदर्भस्तरीय कराटे स्पर्धांत येथिल ‘शोतोकान कराटे’ क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग झेप घेत सिल्वर व ब्रांझ पदकास गवसणी घालत पवनी येथे मारेगावचा ‘झेंडा’ फडकवला.
नुकत्याच २ जुलै रोजी पवनी जि.भंडारा येथे प्रहार चषक विदर्भ स्तरीय कराटे स्पर्धा थाटात पार पडल्या.यात मारेगावातील ‘शोतोकान कराटे’ क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यात रुद् दुधकोहळे (गोल्ड मेडल), अविष्का बिडकर (सिल्वर मेडल), भूमिका मस्की (सिल्वर मेडल), दिशा गाडगे (सिल्वर मेडल), साई फुरकुटे (सिल्वर मेडल), अंशू जंगेवार (ब्रांज मेडल), कार्तिक माफुर (ब्रांज मेडल), शुभ टेकाम (सिल्वर मेडल), संदेश माफुर (सिल्वर मेडल), ऋतिक माफुर (ब्रांज मेडल) मिळवत चिमुकल्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली.
सर्व चिमुकल्यांनी आपल्या यशाचे श्रेय शोतोकान कराटे क्लासेसचे मुख्य प्रशिक्षक संतोष राठोड (ब्लॅक बेल्ट) यांचेसह आपल्या आई-वडिलांना दिले. चिमुकल्यांच्या या दैदिप्यमान यशाने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.