
– न्यायालयात जागतिक बालकामगार विरोध दिन संपन्न
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात १२ जुन रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वासाडे,प्रमुख पाहुणे ऍड.परवेज पठाण,ऍड प्रयाग रामटेके,ऍड प्रफुल भोयर,ऍड आनंद जोशी आदी मंचावर उपस्थित होते.
संपूर्ण जगभरात बालकामगार विरोधी दिन दरवर्षी १२ जून रोजी पाळण्यात येतो.बालमजुरीला आळा घालण्यासाठी बालकामगार प्रथा कायमची बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाजामध्ये सामाजिक जागृती घडून यावी याकरिता १२ जून २००२ पासून जागतिक कामगार संघटनेच्या वतीने बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात करण्यात आली.
दरम्यान १२ जून रोजी मारेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात बालकामगार विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना न्यायाधीश वासाडे यांनी सांगितले की,बालकामगार ही अनिष्ट प्रथा आहे.कोणीही १४ वर्षे आतील बालकांना कामावर ठेवू नये अथवा कामगार बनुवू नये असे केल्यास कायद्याने हा गुन्हा आहे. बालकांचे जीवन सर्वांग सुंदर बनविण्याकरिता शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येते. तसेच बालकांचे बालपण हरवू नये, त्यांची शैक्षणिक उत्तुंग भरारी व्हावी .जेणेकरून सर्वांगीण विकास होईल. पर्यायाने देशाचा व समाजाचे हीच साधला जाईल. जर कोणी बालकामगाराच्या हाताने काम करीत असेल तर त्याची माहिती बालकामगार विभागात व पोलिसांना कळवावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. मेहमूद खान यांनी तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक जे.एस. अलोन यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.