
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” (टप्पा २) अभियाना अंतर्गत स्थानिक मारेगावातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाने मारेगाव तालुक्यातुन द्वितीय क्रमांक पटकाविला.परिणामी शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमाचा टप्पा दोन नुकताच पार पडला.यात मारेगाव तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला होता.सदर उपक्रमात स्थानिक मारेगावातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकाविला. यात शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता,अध्ययन अध्यापनात शैक्षणिक साधनांचा वापर,आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, पर्यावरण संवर्धन, कला,क्रीडा, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी गुणांचा विकास, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य हे सर्व निकष पूर्ण करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करीत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाने सदर यश प्राप्त केले.
शाळेच्या यशात संस्थेचे अध्यक्ष अरविंद बोबडे, सचिव विप्लव ताकसांडे, उपाध्यक्ष प्रेमानंद भेले व इतर संचालक मंडळ, विद्यार्थी विद्यार्थिनी, मुख्याध्यापक हेमंत अनिल ताजने, सहाय्यक शिक्षिका सौ.वनिता दुर्गे,सहाय्यक शिक्षक प्रफुल ठाकरे, सहाय्यक शिक्षिका कु. अश्विता परचाके,लिपिक रोहित काळे यांचे सहकार्य लाभले.
शैक्षणिक गुणवत्ता राखत विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत शाळेने यशस्वी प्रवास केला आहे व तो यापुढेही कायम सुरू राहील असे मनोगत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत अनिल ताजणे यांनी यावेळी व्यक्त केले.
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत द्वितीय क्रमांक आल्याने शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.