
– कोतवाल संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथील तहसील कार्यालयात पगार बिला विषयी माहिती घेण्या करिता गेले असता संबंधित कर्मचाऱ्यांकडून तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याने ता.नऊ मे रोजी मारेगाव कोतवाल संघटनेने कोतवाल आस्थापना बदली करुन मिळणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
‘आधीच तुटपुंजे मानधन त्यात वेळेवर मिळेणा’ अशी कोतवालांची परिस्थिती असल्याने पगार बिला विषयी माहिती घेण्याकरिता येथील तहसील कार्यालयात गेले असता आस्थापना लिपिक यांचेकडून तुच्छतेची वागणूक दिली जात असुन महिन्याच्या पंधरा तारखेनंतरच पगार होतात.
याबद्दल सदर लिपिकांस विचारणा केली असता पगारा करिता लेखी माहिती मागितली जात असल्याने अखेर कोतवाल कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत सदर आस्थापना बदलून मिळणेबाबत या.९ मे रोजी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी राज्य कोतवाल संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत निमसटकर यांचेसह उपाध्यक्ष बंडू उराडे,ए.पी.कोयचाडे, व्ही.एम.मडावी,आर.सुरपाम,व्ही.आत्राम,गणेश भट ,जगदीश कनाके, बळवंत कोवे ,प्रभाकर चांदेकर, दिलीप पचारे संदीप कुळसंगे उपस्थित होते.