
– नागरिकांनी सजग राहण्याची गरज
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
गेल्या दोन दिवसापासून आकाश ढगांनी व्यापले असल्याने उन्हाचे चटके काहीसे कमी जाणवत आहे.प्रादेशिक हवामान पुर्वानुमान केंद्र नागपूर यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील दोन दिवस यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे.
७ व ८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र,नागपूर यांनी वर्तविला असून दरम्यानच्या काळात नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी वातावरणीय अंदाज पाहून आपल्या कामांचे नियोजन करावे.