
– गळाभेट अन् शुभेच्छा
– मुस्लिम बांधव ईदगाह येथे एकवटले
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-उल-अजहा हा सण २९ जुन रोजी येथील ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा करून एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देऊन मोठ्या उत्साहात साजरा केला.
आज हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र दिवस आहे. यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत.परिणामी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
२९ जुन रोजी सकाळी दहाचे सुमारास शहरातील ईदगाह मैदानावर गौसिया मस्जिद चे मौलाना रीहान रशीद यांचे नेतृत्वात हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.त्यांचेकडून नमाज पठण करण्यात आले व नमाजची सांगता झाली.
गौसिया मस्जिद चे मौलाना रीहान रशीद यांचेकडून मुस्लिम बांधवांसह शहरवासीयांना ‘ईद उल अजहा’ च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला , प्रेम व आपुलकीचा उत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.