
— बुरांडा (खडकी) येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क / मारेगांव …
कर्क रोगाने त्रस्त एका ४५ वर्षीय महीलेने विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपविल्याची घटना ता.२३ फेब्रुवारी रोजी बुरांडा (खडकी) येथे सकाळी साडे सहा वाजेदरम्यान उघडकीस आली.
विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या ४५ वर्षीय महिलेचे नाव मंदा आनंद ताकसांडे असुन त्या खडकी बुरांडा येथे मुलगा व मुलीसह वास्तव्यास होत्या. त्यांच्या पतीचे काही वर्षाआधी निधन झाले होते. मृतक मंदा ह्या मागील दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या, व त्यांचेवर वर्धा येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांच्यावर ९ महीन्याअगोदर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे जेवन बंद होते व फक्त दुधावरच जीवन कंठत होत्या.
दरम्यान ता.१२ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता मुलगी लघुशंकेसाठी उठली असता तीला आई खोलीत दिसल्या नसल्याने भावाला व आजुबाजुच्या नागरीकांना बोलावून शोधाशोध सुरु केली असता सकाळी सहा साडे वाजता गावातिल ग्रामपंचायतचे विहीरी जवळ चप्पल आणि निळ्या रंगाची ओढणी दिसल्याने विहीरीत गळ टाकुन पाहिले असता गळाला लटकुन विहीरीच्या पाण्यात तरंगत दिसल्या. सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी असा व आप्त परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात जमादार राजु टेकाम, दत्तू किनाके करीत आहे.