
– म.न.से.तालुका शाखा मारेगांव यांचे तहसीलदारांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील निराधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडुन हयात दाखले तथा उत्पन्नाचे दाखले सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून वृध्दांना हे न परवडणारे असल्याने हे दस्तऐवज तात्काळ रद्द करण्यात यावे,अशा आशयाचे निवेदन तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांचे नेतृत्वात तहसीलदारांना देण्यात आले आहे.
तालुक्यात निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी योजनेच्या लाभासाठी सर्वच कागदपत्रे सादर करुन लाभ मिळवून घेतला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसापासून शासनाचे पत्रान्वये सर्व लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले तसेच हयात दाखले सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
उपरोक्त कागदपत्रे वृध्द निराधार लाभार्थ्यांना न परवडणारे नसुन यामुळे मात्र त्यांच्यावर भुर्दंड पडत असून शासनाने “शासन आपल्या दारी” या योजने अंतर्गत ही कागदपत्रे लाभार्थ्यांना त्रास न देता स्वतःच्या यंत्रणे मार्फत गोळा करुन घ्यावी. ही अट रद्द न झाल्यास मनसेचे नेते तथा राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचे जन्मदिनी आंदोलन करणार असल्याच्या गर्भित इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शहर अध्यक्ष शेख नबी, चांद बहादे, अनंत जुमळे, सुरज नागोसे, आदित्य बुचे, तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महीली आघाडीच्या प्रतिभा तातेड, संगीता सोनुले, सिंधु बेसकर, बेबी आत्राम यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.