
– वणी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : प्रफुल्ल ठाकरे
वणी येथील नगर परिषदे लगत असलेल्या पार्किंग मध्ये २५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान उभ्या कारणे अचानक पेट घेतल्याने ‘द बर्निंग’ कारचा थरार वणीकरांनी अनुभवला.
वणी नगरपरिषदे लगत असलेल्या पार्किंग मध्ये कार उभी असता (क्र.एम.एच.३४ ए.ए.७४८९) कारने दुपारी दीड वाजे दरम्यान अचानक पेट घेतला.उभ्या कारने अचानक पेट घेतल्याने काही वेळ परिसरात पुरता गोंधळ उडाला.
कारमध्ये कुणी नसल्याने सुदैवाने यात कुठलीही ही जीवितहानी झाली नाही.कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पाणी व माती टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहीपर्यंत गाडी कुणाच्या मालकीची होती ती बाब कळु शकली नाही.