
– ग्राहकांना होतोय नाहक त्रास
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गेल्या काही दिवसापासून भारत संचार निगम लिमिटेड च्या भोंगळ कारभाराचा शहराला चांगलाच फटका बसला आहे.बीएसएनएलचे जाळे विस्तृत असल्याने कार्यालयीन कामात अनेक अडचणी येत असून याचा नाहक त्रास ग्राहकांना होतो आहे.
बीएसएनएलचे मारेगाव शहरासह ग्रामीण भागात मोबाईल ,लँडलाईन, फॅक्स, ब्रॉडबँड इत्यादींचे मोठे जाळे आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून बीएसएनएल ची सेवा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने व बीएसएनएल ब्रॉडबँडची गती कमालीची हळू झाल्याने याचा नाहक त्रास बीएसएनएल ग्राहकांना होतो आहे.
शहरातील बीएसएनएल कार्यालयात गेले असता येथे कर्मचारी उपलब्ध राहत नसल्याचे काही नागरिकांचे सांगणे असून जाब कुणाला विचारायचा….? असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जातो आहे.
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. मोबाईल रिचार्ज करिता बाजारात विविध कंपन्यात स्पर्धा असताना बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन हे अगदी स्वस्त आणि मस्त आहे. परंतु बीएसएनएलची ढेपाळलेली सेवा ग्राहकांना आकर्षित करण्यास पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी झालेली दिसत नाही.त्यामुळे ‘कनेक्टिंग इंडिया’ हे बीएसएनएलचे ब्रीदवाक्य असले तरी बीएसएनएल पासून लोक ‘डिस्कनेक्ट’ होताना दिसून येत आहे.